प्रशांत बोरकर यांची ‘भारतीय किसान संघटनेच्या’ प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे/आत्माराम ढेकळे, दि.15
रावेर जि.जळगाव येथील प्रसिध्द ओबीसी नेते प्रशांत बोरकर यांची शेतकरी यांची प्रमुख संघटना “भारतीय किसान संघटन,नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील विविध घटकासाठी तसेच शेतकरी कष्टकरी महिला,विद्यार्थी ,ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक साठी सातत्याने झटणारे नेते प्रसिध्द सामाजिक विचारवंत,निर्भीड निस्वार्थी पत्रकार प्रशांत बोरकर यांची भारतीय किसान संघटन च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के यांनी मुंबई मध्ये निवड जाहीर केली.प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रशांत बोरकर यांचा कार्याच्या आढाव्यात प्रामुख्याने ओबीसी,आदिवासी,विद्यार्थी चळवळ ,प्रवासी ग्राहक ,मानवी ग्राहक हक्क आदीसाठी त्यांचे सातत्याने कार्य आहे.तसेच शेतकरी कष्टकरी ,आदिवासी भटके विमुक्त वंचित यांना शेतकरी योजनांचा लाभ त्यांनी मिळवुन दिला.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या उद्देशाने ‘शेतकरी कर्जमाफी ‘आंदोलन मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.प्रामुख्याने जनतादल सह तिसरी आघाडी सरकार मधील अनेक राष्ट्रीय नेते,माजी पंतप्रधान ,माजी मुख्यमंत्री मंडळीआदींसी जवळचा संबधआहे.प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी महत्वाची पद भुषविले आहेत.सर्व समाजासाठी न्याय मिळवुन देण्याचेही कार्य केले. तसेच शेतमजुर बेरोजगार वर्गांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे धोरण भारतीय किसान संघटनेचे असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के यांचे वतीने प्रशांत बोरकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.याबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्या कार्याचे कौतुक होऊन अभिनंदन होत आहे.