pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र नांदेड जिल्हात एकशे पंच्याऐशी वी शाखा बोर्ड अनावरण व मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर हस्ते संपन्न

0 3 8 4 4 1

नांदेड/प्रतिनिधी, दि.9

माहुर तालुक्यातील रूई बु येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या हस्ते बोर्ड अनावरण व दिव्यांग निराधार मेळावा उत्साहात संपन्न
बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, गावातील सरपंच,पो.पाटिल, तंटामुक्त चे अध्यक्ष, संघटनेचे जिऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार ता.अध्यक्ष ऊमेश भगत सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते बोर्ड अनावरण करून मेळाव्यास सुरूवात करण्यात आली.
प्रथम थोर पुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ.लताबाई राऊत तर प्रमुख वक्ते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, प्रमुख उपस्थिती जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ
शेरकुरवार,ता..अध्यक्ष ऊमेश भगत,प्रेमसिंग चव्हाण महिला अध्यक्ष बबिता मारबते इ मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
प्रास्ताविक माहुर ता अध्यक्ष यांनी संघटनेने केलेल्या कार्यामुळे अनेक सवलती मिळत आहे आपण आपल्या हक्कासाठी सर्वांनी संघटित संघर्षात सहभागी व्हावे असे मनोगत व्यक्त केले
जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार यांनी डाकोरे पाटिल दोन्हि पायाने दिव्यांग असुन व ते दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधाराना न्याय हक्क मिळावा म्हणून नौकरी सोडुन दहा वर्षांपासून संघटनेच्या चळवळित मी त्यांच्या सोबत असुन त्यांच्या संघर्षामुळे गाव पातळीवर दिव्यांचा ना न्याय मिळत असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
अनेक मान्यवर या. गायकवाड, दादाराव कांबळे,पो.पाटिल राजेश सुकळकर,जेष्ढ नागरिक जिल्ह्यांनी भाई यांचे संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला.
या.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर आंदोलन, सदनिर मार्गाने करून शासन प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न केले व नांदेड जिल्हातील गाव तिथै दिव्यांग संघटनेच्या बोर्ड अनावरण आज एकशे पंच्याऐशी शाखेचे अनावरण आपल्या सर्वांच्या संघटितपणे संघर्षात होत आहे.
शाखा बोर्ड अनावरण का करावे लागते त्यांचे उदाहरण असे कि दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हि शाखा गावात असेल तर येणाऱ्या अधिकारी, लोकप्रतिनिधीला दिनदुबळ्याची आठवण व्हावी त्यांचा हक्काचा निधीची चोरी होऊ नये तसेच निवडणुकीत लोकप्रतिनिधी तरुण मुलांना त्यांच्या पक्षाचे नाव उमेदवाराचे फोटो असलेले टि शर्ट वाटप किंव्हा महिलांना साडी वाटप,कॉलेन्डर,छत्र्याचे मतदाराना वाटप करतात तसेच या लोकप्रतिनिधी दिव्यांग वयोवृध्दाना एखादे साहित्य देण्याची वृत्ती निर्माण व्हावी व गावातील जनतेला दिव्यांगाना व्यंगावर बोलण्याची हिंमत होऊ नये जसे पुर्वा दिव्यांचा ना अपंग,आंधळा,पांगळा खुळा म्हणत होते आता असे म्हणेल त्यांना दिव्यांग कायदा कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्यांना तिनं महिने जमानत होत नाहि पण हि जागृती दिव्यांग व जनतेत व्हावी म्हणून गाव तिथे शाखा बोर्ड अनावरण नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात करुन दिव्यांग हक्काच्या सवलतीची माहिती व्हावी म्हणून बोर्ड अनावरण एकशे पंच्याऐशी शाखेचे करण्यात आले तसेच यापुढे जास्तीत जास्त दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले
या मेळ्यात विष्णू गायकवाड
सोंडवले शहर प्रमुख दादाराव कांबळे जि प वानोळा सर्कल राजेश सुकळकर, पुष्पा बाई कलाने,गजानन खोकले,रामा वाघाडे,शोभाबाई वाघाडे,संगीता ढोले,दत्ता भालेराव,गणेश राऊत,आनंदा कलाने,गजानन पवार,मुकुंदा चौधरी,पांडुरंग कलाने,जिलानी भाई,धानोरा सर्कलचे दिव्यांचा व गावातील उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रक राजेश सुकळकर यांनी दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे