pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

“महाज्योतीच्या एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांचे सुयश ” 51 प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्रात पीएसआय पदी निवड !

0 1 2 1 1 2

 जालना/प्रतिनिधी,दि.14

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व ज्ञानदीप अकॅडमी, पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी याकरीता एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.
वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात  इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 1/5/2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते.
त्याकरिता एकूण 15,661 उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी 1,495 उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. उमेदवारांना दरम्यानच्या काळात प्रतिमाह 10,000 विद्यावेतन देण्यात आले. नुकतेच या प्रशिक्षणातून 51 प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात पीएसाआय म्हणून निवड झालेली आहे. यात 31 इतर मागास वर्ग,  17 विमुक्त जाती – जमाती, 3 विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा समवेश आहे.
यशस्वी उमेदवारांमधे विलास हाके, महेश जगताप, नितीन चव्हान, निवृत्ती माने, सुषमा मंदावकर, कोमल कुमावत, पुजा जाधव, भाऊसाहेब गोपालघरे, श्याम खरात, किरण देशमुख, रणधीर खर्चे, शुभम भोतमांगे, अमोल झंजाड, काजल नेमाडे, अंजली खोब्रागडे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत
1)श्याम सादाशिव खरात-मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे. उच्च शिक्षणासाठी तडजोड करावी लागली. शेतीवर उदरनिर्वाह करणार कुटूंब असल्याने घरुन आर्थिक मदत घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे भविष्याची चिंता होती. वृत्तपत्रात एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेची माहिती वाचली. सुचनेनुसार अर्जप्रक्रिया केली. निवड झाली आणि प्रशिक्षणास सुरवात झाली. महाज्योतीतर्फे देण्यात येणार्‍या विद्यावेतनाचा परीक्षेसाठी आणि शारिरीक प्रशिक्षणासाठी खुप लाभ झाला. महाज्योतीच्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले आम्ही सर्व विद्यार्थी महाज्योतीच्या जीवावर जगलो, तगलो असे म्हणता येईल.
2)अंजली रविंद्र खोब्रागडे-पदवी शिक्षण घेत असतांना पोलीस डिपार्टमेंट विषयी आकर्षण वाटायला लागले. वडील नेव्ही मध्ये असल्याने त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. पुढे वृत्तपत्राच्या माध्यमातून महाज्योती च्या एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेची माहिती वाचली. रितसर अप्लाय केला. निवड झाली. आणि प्रशिक्षणास सुरवात झाली. विद्यावेतनाचा शारीरिक प्रशिक्षण घेण्यात खुप लाभ झाला. प्रोटीन डायेट, जिम, आणि इतरही मार्ग दर्शनाचा लाभ घेता आला. आता अकरा महिन्याच्या ट्रेनींग नंतर आमची पोस्टींग होईल. आम्हा सर्व विद्याथ्यांच्या यशात महाज्योतीचा महत्त्वाचा वाटा राहील. असेप्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा