श्री माँ वैष्णवदेवी मित्र मंडळ उरण द्वारा २० वा भव्य विशाल जागरण उत्साहात संपन्न
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
श्री माँ वैष्णव देवी मित्र मंडळ उरण नवी मुंबईच्या माध्यमातून दरवर्षी ‘जागरण की शाम माता के नाम’ या नावाने भव्य विशाल जागरण (चौकी) चे आयोजन केले जाते. १९ वर्ष सतत हे जागरण चालू आहे.यंदाचे जागरणचे २० वे वर्ष असून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नगर परिषद मराठी शाळा, पेन्शनर्स पार्क, एनएमएमटी बस स्टॉप, उरण शहर येथे २० व्या भव्य विशाल जागरण (चौकी) चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पूजा, अभिषेक, भजन महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.श्री हरिओम भारद्वाज (व्यास)आणि त्यांचे साथीदार व वाराणसीचे कलाकार यांनी माँ वैष्णव देवीचे भजन गाणे गाउन रसिक प्रेषक, भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले होते. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री माँ वैष्णवदेवी मित्र मंडळ उरणचे अध्यक्ष – बाबुराम वर्मा,उपाध्यक्ष सत्येंद्र सिंह,जनरल सेक्रेटरी- प्रभूनाथ सिंह, कोषाध्यक्ष भगवती शर्मा, कार्यकारी अध्यक्ष- सुंदर यादव, सेक्रेटरी दिनेश सिंहजी,संघटन मंत्री ललित सिंहजी, सहकोषाध्यक्ष अनिल गुप्ता, वरिष्ठ कार्यकर्ता – ग्यानचंद्र वर्मा , मुंशी यादव, नरेंद्र शुक्ला, अमर श्रीवास्तव,सियाराम यादव,प्रचार मंत्री बेचन परदेशी, अजय म्हात्रे, सनी म्हात्रे, लालू सिंह , मून्ना पांडे, कुमार जाधव, विजयनाथ यादव, रंजन श्रीवास्तव, राजेश यादव आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. जागरणला (चौकीला ) भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी दिली.