pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मागण्या पूर्ण न झाल्याने सारपंचासह कर्म

0 1 7 4 1 6

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.20

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कामकाज तीन दिवस बंद राहणार सरपंच ग्रामसेवक कर्मचारी रोजगार सेवक संगणक परिचालक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे यांची माहिती ग्रामपंचायत तीन दिवस काम बंद आंदोलन टेंभुर्णी चा कारभार चालवणारे सरपंच सदस्य ग्रामसेवक रोजगार सेवक ग्राम संसद सर्व कर्मचारी संगणक परिचालक इत्यादींच्या मागण्यासाठी १८ ते २० डिसेंबर २०२३ ग्रामसंसदती मध्ये काम बंद आंदोलन करणे संदर्भात संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री रोजगार हमी योजना मंत्री यांना निवेदन देऊ कळवले आहे राज्यात संघटनेच्या आदेशाप्रमाणे जालना जिल्ह्यातील वरील सर्व संघटनेच्या माध्यमातून तीन दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना निवेदन देण्यात आले आहे ग्राम संसद विषयी निगडित काम करणाऱ्या अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्राम संसद सर्व कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक व जिल्हा परिषद कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी राम संसद सर्व कर्मचारी संघटना यांच्या वतीने विविध मागण्यासाठी १८ ते २०डिसेंबर २०२३ पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे यात सरपंच संघटनेच्या वतीने ग्राम संस्थेच्या आर्थिक अष्ट सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ व करांची परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकासने तातडीन बैठक घेऊन अनेक निर्णय करावेत आमदार निधीच्या प्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी ग्राम संसद सदस्य निधी असावा ग्राम संसद सदस्य भत्ता व सरपंच उपसरपंच मानधन थकीत बाकी अदा करावी त्यात भरीव वाढ व्हावी दरमहा न मागता द्यावे 100% रक्कम शासनानेच द्यावी विमा संरक्षण द्यावी शासकीय कमिटीत स्थान असावे टोल फ्री मिळावी शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद च्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्राम संसद सदस्यांना मतदानाच्या अधिकार असावा व इतर राज्यात आहे शिक्षक पदवीधर याच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावी जिल्हा परिषद मध्ये सरपंच कक्ष तर मुंबईत निवास व्यवस्था वाचनालय कॉन्फरन्स हॉल असे मल्टी पर्पेज सरपंच भवन असावी विकास कामाच्या बाबतीत शहर व गाव खेड्यांना सारखेच निकष असावेत अशा विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्राम संसद कर्मचारी सर्व रोजगार सेवक संगणक परिचालक यांनी सहभागी व्हावी असे आव्हान सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघन कणसे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डीबी काळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप राठोड रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित चाटक संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय दयानंद रेडेकर यांनी केली आहे टेंभुर्णी ग्राम संसद यांच्या वतीने तीन दिवस काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सरपंच सुमनबाई म्हस्के मनिषा पाचे ग्राम विकास अधिकारी जे यु आढाव लिपिक विक्रम उकांडे परिसंचालक बाबासाहेब जमधडे अजिस बागवान कोकीळा पंडित भाले बाबू साबळे दिगंबर भिसे शंकर आढावे भिका माने अनिल गायकवाड योगेश गायमुखे सुनिल भाले रामदास धनवाई ग्राम संसद सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम संसद सदस्य सर्व कर्मचाऱ्याचा १८ते २० तारखेपर्यंत संप आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे