pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतूनच परिपूर्ण शिक्षण मिळते:जाधव.

दौलतपुरा जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतूनच परिपूर्ण शिक्षण मिळते असे प्रतिपादन जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश जाधव यांनी शनिवारी ता.1 केले. जाफराबाद शहरातील दौलतपुरा जिल्हा परिषद शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक भगवानसिंग इंगळे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद कळंबे, वसंता शेवाळे, राजू कुमावत, गणेश ठाकूर, प्रकाश मिरगे, प्रल्हाद लोणकर, चेतन बायस, अनिल मोरे, नारायण वैद्य, अजीम शेख,बाळासाहेब वाघ यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री जाधव म्हणाले की खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांचे फॅड वाढले असले तरी सरकारी शाळांची क्रेझ देखील कमी झालेली नसून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षित आणि टीईटी उत्तीर्ण शिक्षक नेमलेले असतात असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीते लोकगीते हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी तब्बल 1 लक्ष 40 हजार रुपये इतक्या विक्रमी बक्षीसांचा वर्षाव झाला जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्नेहसंमेलनातील बक्षिसाच्या रकमेचा हा उच्चांक समजला जातो. स्नेहसंमेलनासाठी डिजिटल स्क्रीनचा वापर करण्यात आला हे या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय वैद्य, माधव शिंदे प्रेरणा मोरे, शिवम गोठवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष काळे गणेश पठाडे, कौतिकराव फोलाने, प्रतिभा राजपूत, छाया पुंगळे,संगीता वायाळ, प्रज्ञा लोखंडे, शितल सांगळे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. *चौकट* वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की इंग्रजी शाळा आणि खाजगी शाळेतील भव्य स्टेज आणि झगमगाट पहायला मिळतो.या शाळांना ही मागे टाकत दौलतपुरा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये करण्यात आलेला डिजिटल स्क्रीनचा वापर हे या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा देखील सर्व प्रकारचे अध्ययन अनुभव देण्यात मागे नसल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला. *चौकट*. *बक्षिसांचा उच्चांक* वार्षिक स्नेहसंमेलन असले की उपस्थित पालक,प्रेक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दात देत बक्षीस देत असतात. या जमा झालेल्या बक्षिसाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता शिक्षक त्या माध्यमातून करत असतात. दौलतपुरा जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनात 1 लक्ष 40 हजार एवढे विक्रमी बक्षीस जमा झाल्याने जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्नेहसंमेलनातील बक्षिसांचा हा उच्चांक समजला गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे