भाजपाची भव्य तिरंगा यात्रा संपन्न
देश सैन्यांच्या व पंतप्रधानांच्या पाठीशी - भाजप नेते श्री.रावसाहेब पाटील दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.18
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, देशभरात तिरंगा यात्रा काढली जात आहे. (ता.१८) रविवारी जालना शहरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपा नेते तथा माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे आणि भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, भाजपा जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी मंत्री आ.अर्जुनरावजी खोतकर, आ.संतोष पाटील दानवे यांच्यासह जालना शहरातील नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, देश लष्कर आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही यात्रा देशाची आहे. येथे अनेक लोक तिरंग्यासाठी उभे राहिले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, देशभरात तिरंगा यात्रा काढली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने लष्करी शक्तीचा योग्य वापर करून जगाला संदेश दिला आहे की, भारत दहशतवादाविरुद्ध गप्प बसणार नाही. भारतीय सैन्याने शौर्य दाखवले आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तिरंगा हा आपल्या सन्मानाचे, प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. देशाची गौरवशाली परंपरा जाणून घेणे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आदर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ही यात्रा देशाच्या एकतेचे, अखंडतेचे आणि शूर सैनिकांना श्रद्धांजलीचे प्रतीक आहे असे हि ते म्हणाले.
या तिरंगा यात्रांमध्ये माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये देशप्रेमींनी भारत माता कि जय, इंडियन आर्मी झिंदाबाद, ऑपरेशन सिंदूर झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
हि तिरंगा पदयात्रा जनार्धन मामा चौक येथून सुरु होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-टांगा स्टैन्ड् ते बडी सडक येथील श्री राम मंदिर येथे महाआरती करून समारोप करण्यात आल. सदरील भव्य तिरंगा रॅली पदयात्रेस देशप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजक भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सर्व देशप्रेमींचे, माजी सैनिकांचे व जालना शहरातील नागरिकांचे सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.