येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ठकाजी वीर हे ३९ वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, नारायण कावळे, लहाने, खडके, गळधर, रवी कोरूडे, संभेराव, श्रीमती धनवड, श्रीमती मीना घुले आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ठकाजी वीर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठकाजी वीर यांनी १९८५ साली राजूर येथील आरोग्य केंद्रावर शिपाई म्हणून सुरूवात केली. त्यानंतर अंबड आणि जालना जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून काम केले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.