अकोट शहरातील नागरिकांना महावितरण कंपनीचा मानसिक व शारीरिक त्रास
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोटच्या वतीने निवेदन

अकोला/डॉ संजय चव्हाण,दि.19
अकोट शहरातील अर्बन महावितरण कंपनीच्या शब्दात क्र.१,२,३ हे अर्बन कार्यालय दर्यापुर रोड येथील विभागीय कार्यलयाच्या आवारात स्थापित होते.परंतु मागील सहा महिन्यापासुन अर्बन कार्यालय क्र.१ व ३ हे स्थलांतरित करुन अर्बन क्र.१ MIDC अकोट तसेच अर्बन क्र.३ हा ITI जवळ हलविण्यात आले आहे.ही दोन्ही अर्बन कार्यालय पूर्वीच्या ठिकाणावरून ३ कि.मी.अंतरावर आहे.तरी या कार्यलयात साधी लाईन बंद असल्याची तक्रार मांडण्यास ग्राहकास नाहक त्रास घेत इतक्या दुर जावे लागते आणि महत्वाचे अर्बन १ व ३ कार्यलयाशी संबंधित एरिया जो आहे तेथुन हे कार्यालयात जाण्याकरिता कोणतेही साधन मिळत नाहीत.आणि नागरिकास नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर अर्बन कार्यालये ही पुर्वरीत जागेवर शहराच्या मध्यभागी स्थानबद्ध करावी जेणे करून महावितरण ग्राहकांना त्रास होणार नाही.संबंधित महावितरण अधिकारी यांनी लवकरात लवकर संबंधित तक्रारी कडे लक्ष केंद्रित करुन येत्या सात दिवसात पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे न झाल्यास नागरिकांना होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला संबंधित जे कोणी महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील यांना मनसे स्टाईल मध्ये उत्तर देण्यात येईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच मागणी पुर्ण नाही झाल्यास आपल्या कार्यलयात ठिय्या ठोको आंदोलन करण्यात येईल.सदर निवेदन विठ्ठलजी लोखंडकार,राजेश काळे यांच्या मार्गदर्शनात ॲड.श्रीरंग तंटे,प्रदीप गावंडे,कैलास धुळे,दीपक बोडखे यांच्या प्रमुख उपस्थितीत.शशांक कासवे,सुरज वर्मा,आदित्य तळोकार,नितेश चावडा यांनी दिले