pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मा. ना. श्री. रावसाहेबजी दानवे पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत “स्वच्छता पंधरवाडा-स्वच्छता ही सेवा २०२३” या उपक्रमांतर्गत “एक तारीख – एक तास” स्वच्छता मोहिम

0 1 2 1 0 1

जालना/प्रतिनिधी, दि.1

महात्‍मा गांधी जयंतीचे औचित्‍य साधुन आज दिनांक ०१.१०.२०२३ रोजी जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील एकुण ३० वार्डामध्‍ये ६० ठिकाणी स्‍वच्‍छता पंधरवाडा-स्‍वच्‍छता ही सेवा २०२३” या उपक्रमांतर्गत एक तारीख – एक तास” स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले.  याचा शुभारंभ मा. ना. श्री. रावसाहेबजी दानवे पाटील, केंद्रीय रेल्‍वे राज्‍य मंत्री भारत सरकार यांच्‍या हस्‍ते शहरातील मोतीतलाव चौपाटी (पश्चिम बाजुस) येथे करण्‍यात आले.  यावेळी मा. श्री. कैलासजी गोरंटयाल, आमदार जालना, मा. श्री. आबा पाटील दानवे, मा. जिल्‍हाधिकारी श्री. श्रीकृष्‍ण पांचाळ, मा. आयुक्‍त तथा प्रशासक श्री. संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याकरिता सदरील ठिकाणी स्‍वच्‍छतेबाबत श्रमदान, स्‍वच्‍छता मोहीम, प्‍लास्‍टीक कचरा संकलन,  स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती तसेच मुख्‍य बाबत म्‍हणुन मोती तलावातील जमा झालेले निर्माल्‍य गोळया करण्‍यात आले.  यामध्‍ये मोती तलावाजवळील संपुर्ण कचरा संकलन करुन मोती तलाव स्‍वच्‍छ करण्‍यात आले.

तसेच मनपातील कार्यालयी अधिक्षक श्री. विजय फुलंब्रीकर, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. सय्यद सऊद, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख श्री. पंडीत पवार, अग्निशमन विभाग प्रमुख श्री. माधव पानपटटे, श्री. महेश भालेराव, श्री. सचिन मेहरा, श्री. प्रफुल अंबेकर, श्री. ऋषिकेश शेडुते, शहर समन्‍वयक कुमारी सुजाता तुपे तसेच शहरातील विविध सामाजिक संस्‍था, विविध पक्षाचे कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, मनपातील अधिकारी व कर्मचारी असे एकुण ७००-८०० जणांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 1