pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद प्रितमदादामध्येच – सचीन ताडफले

0 3 3 8 7 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

उरण तालुक्याच्या विकासाकडे येथील थापेबाज आमदाराचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे तालुका विकासाच्या प्रक्रीयेतून १० वर्ष मागे गेला आहे. या तालुक्याला विकासाच्या प्रक्रीयेत आणून तालुक्याचा विकास साधण्याची ताकद फक्त प्रितमदादा याच्यामध्येच आहे असा ठाम विश्वास सचीन ताडफले यानी पुनाडे ग्रामस्थासमोर बोलताना व्यक्त केला.
शेकाप आघाडीचे उमेदवार प्रितमदादा म्हाञे याच्या निवडणूक प्रचारानिमीत पूनाडे येथे प्रितमदादा म्हाञे यानी पुनाडे गावात रॅली आयोजित केली होती. यावेली ग्रामस्थानी प्रितम म्हाञे याचे भव्य स्वागत केले. यावेली झालेल्या सभेत बोलताना सचीन ताडफले म्हणाले की या तालुक्याचा विकास केवल आ. विवेक पाटील यानीच केला नंतरच्या काळात आलेल्या आमदारानी लोकाना आवश्यक मुलभूत प्राथमिक गरजा व विकासाकडे दुर्लक्ष केले. आज शेकापकडे कुठलीच सत्ता नाही माञ शेकापची नाळ सर्वसामान्य जनतेशी असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यात शेकाप आघाडीवर असतो. महायुतीचे दोन्ही उमेदवार रिटायर्डचे वय उलटून गेलेले आहे त्याच्या काम करण्याची उर्जा राहिलेली नाही अशा रिटायर लोकाना पेन्शनवर पाठवून कामाचा प्रचंड आवाका असलेल्या प्रितमदादाना प्रचंड मतानी विजयी करावे असे आवाहन त्यानी केले. यावेली बोलताना प्रितमदादा म्हाञे म्हणाले तालुक्याचा विकास साधताना समोर व्हिजन आवश्यक आहे तालुक्यात तरूणाना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे आमच्या तरूणाकडे शिक्षण आहे माञ योग्य रोजगार तंञ नसल्याने तो रोजगाराच्या स्पर्धेत मागे पडत आहे त्यासाठी आपण प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आपण एअरपोर्टवर ४४ जणाना नोकऱ्या मिळवून देवू शकलो भविष्यात आपण हजारो युवकाना रोजगार उपलब्ध करून देवू येथील समाजाला विकासाच्या दिशेने नेण्याचा आपला प्रयत्न राहिल आपल्याला आमदारकी शोभेसाठी नाही तर सेवेसाठी हवी आहे त्यामुले येत्या २० तारखेला शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करावे आपला विश्वास मी वाया जावू देणार नाही असा विश्वास त्यानी यावेळी दिला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 8 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे