श्रीमती रजनी मधुकरराव जोशी(अत्रे) यांचा सेवा गौरव सोहळा

छ.संभाजीनगर/संजीव पाटील,दि.7
श्रीमती रजनी मधुकरराव जोशी (अत्रे) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खुलताबाद येथून पर्यवेक्षिका या पदावरून 32 वर्षे प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी बराच काळ प्रकल्प अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रकल्प कार्यालय खुलताबाद व तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यातर्फे सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. सेवा गौरव सोहळ्याला प्रकल्प अधिकारी श्रीमती बिक्कड मॅडम, पर्यवेक्षिका शिंदे मॅडम, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी कांबळे मॅडम व तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच श्रीमती जोशी यांचे पती रविद्र अत्रे,सुन पुजा अत्रे
अत्रे ,मुलगा मंगेश अत्रे, मंगेश अत्रे नातु सुर्याशं अत्रे कुटुंबीय उपस्थित होते. मला सेवानिवृत्तीचा निरोप देतेवेळेस अंगणवाडी सेविकांच्या डोळ्यात पाणी हीच माझ्या कार्याची पावती मला मिळाली. मला आज माझ्या माहेरी आल्या सारखे वाटते आहे आपण केलेल्या सत्तकारा मुळे मी आणि माझे कुटुंबीय भारावुन गेलो असुन आपले ऋणी आहोत असे प्रतिपादन रजनी मधुकरराव जोशी अत्रे यांनी या प्रसंगी केले.