अभिनेते एम.नटराज महाराष्ट्र बाजार पेठ चे गुण गौरव सोहळ्यात सन्मानित

जालना/प्रतिनिधी, दि.14
अभिनेते एम.नटराज सतत कुठे ना कुठे शूटिंग मध्ये व्यस्त असतात महाराष्ट्र बाजार पेठ चे संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे सर यांनी त्यांच्या कलागुणांची दखल घेत महाराष्ट्र बाजार पेठच्या सातव्या वर्धापन दिन गुणगौरव सोहळा 2024 साठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी अभिनेता या पदात निवड केली कारण त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करणार होते त्यामुळे त्यांनी एम.नटराज यांना अभिनेता म्हणून सन्मान चिन्ह,सन्मान पत्र आणि गिफ्ट देऊन सन्मानित केले,त्यांचे बरोबर अभिनेत्री वर्षा उसगावकर,हास्य कलाकार अभिनेता आशिष सातपुते,अभिनेते नागेश भोसले,पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित,अभिनेते दिगंबर नाईक,अभिनेत्री गौरी नलावडे,अभिनेत्री मेघा घाडगे,अभिनेत्री जुई गडकरी ,अभिनेत्री तन्वी मुंडले,अभिनेते विवेक सांगळे,अभिनेते अमित भानुशाली,अभिनेत्री मयुरा रानडे,निर्माता किरण कुडाळकर,दादूस आदी मान्यवर यांना सन्मानित करणार आले या कार्यक्रमात अभिनेते एम.नटराज आणि हास्य अभिनेते आशिष सातपुते यांनी रंगमंचावर अभिनेत्री वर्षा उसगावकर,अभिनेते नागेश भोसले,दादूस आणि मान्यवरांचे समोर विनोदी स्कीट सादर करून प्रेक्षकांना पोट धरून हसवले,पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते एम.नटराज यांनी महाराष्ट्र बाजार पेठ चे संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे सर आणि त्यांच्या पत्नी सौ.अनुजा दांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले.