महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.19
जालना जिल्हा महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आज येथील जिल्हा पोलीस मैदानावर आयोजन करण्यात आले होते. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी सविता सुत्रावे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धांमधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून सदर उत्कृष्ट खेळाडू हे आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग घेणार आहेत.