pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भावलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्त खळेगाव मठ संस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

परमरहस्य पारायण, दीपोत्सव व ग्रंथ दिंडी सोहळा

0 1 7 4 1 1

गेवराई/प्रतिनिधी,दि.11

तालुक्यातील मठ संस्थान खळेगाव येथे लिंगैक्य त्यागमूर्ती भावलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त दि.१३/०१/२०२४ शनिवार व दि.१४/०१/२०२४ रविवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे श्री. ष.ब्र.१०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या दिव्य नेतृत्वाखाली दि.१३/०१/२०२४ शनिवार रोजी सकाळी रुद्राभिषेक ग्रंथराज परमरहस्य पारायण एकदिवशी सोहळा संपन्न होणार असून सायंकाळी दीपोत्सव होणार आहे. दि.१४/०१/२०२४ रविवारी पुण्यस्मरणा निमित्त सकाळी रुद्राभिषेक ग्रंथदिंडी होणार आहे. या कार्यक्रमास श्री. ष.ब्र.१०८ प्रभूदेव शिवाचार्य महाराज माढेकर मठ संस्थान माढा (सोलापूर) श्री.ष.ब्र.१०८ वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर व श्री.ष.ब्र.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर व श्री. मसाननाथ महाराज चिंतेश्वर संस्थान गेवराई यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे. दुपारी ११ ते १ या वेळेत महाराजांचे प्रवचन होईल व नंतर महाप्रसाद होईल. यावर्षी श्री.यादवराव तुकाराम क्षीरसागर लाडजळगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व भक्त मंडळ खळेगाव मठ संस्थान खळेगाव ता. गेवराई यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे