pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खरा रयत सेवक, कर्मवीरांच्या विचारांचा पाईक!

0 3 2 1 6 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या दापोली विद्यालयाच्या इमारतीचे काम निधी अभावी थांबलेले असताना,विद्यालयाला शुभांगी महेंद्र घरत यांच्या नावे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत २५ लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून इमारतीचे काम प्रगती पथावर आणले.अचानक कोर्ट स्टेमुळे, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादामुळे पुन्हा ७ ते ८ महिने इमारतीचे काम थांबल्यामुळे शेकडो विद्यार्थी खोलीविना वर्गात शिकत आहेत अपघात होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या जीवावर बेतू शकते. याच्यावर मार्ग काढा अशी आर्त साद विद्यालयाच्या प्राचार्या पुष्पलता मॅडम यांनी “ कर्मवीर जयंती” च्या कार्यक्रमात सर्व उपस्थित नेत्यांना घातली. व्यासपीठावर दिग्गज नेते रामशेठ ठाकूर, जे. एम. म्हात्रे, बाळाराम पाटील, महेंद्रशेठ घरत, उपस्थित होते. परंतु नेत्यांचा कानावर विद्यार्थी,शिक्षक, प्राचार्या यांचा टाहो पोहीचला नाही. स्थानिक व्यवस्थापन सल्लागार समिती “कोर्ट स्टे मुळे हतबल होती.
शेवटी स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रकाश जितेकर यांच्या नेतृवाखाली संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे कामगार नेते, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली. आम्ही अनेक नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून मार्ग निघत नाही,आपण आशेचा शेवटचा किरण आहात. ” सुखकर्ता “शेलघर येथे गाऱ्हाणे घेऊन आलेला कोणीही निराश होवून परत जाणार नाही याची नेहमीच महेंद्रशेठ व घरत कुटुंबिक काळजी घेत असतात.त्याप्रमाणे महेंद्रशेठ यांनी कोर्टातून स्टे आणणाऱ्या शेतकऱ्या सोबत दीर्घचर्चा करून मार्ग काढला व त्याचे समाधान होईल असा तोडगा काढला व नूतन इमारतीच्या बांधकामाला शेतकऱ्यानी हिरवा सिग्नल दिला तर कोर्टातून स्टे ही मागे घेण्याचा शब्द दिला. प्राचार्य व स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी ३५ लाखाची वाढीव निधी शुभांगीताई घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय महेंद्रशेठ घरत यांनी घेतला.
शिक्षणासाठी तन -मन -धनाने मदत करून प्रत्येक समस्यावर तोडगा काढून रयत शिक्षण संस्थेच्या कार्यासाठी करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून देणारा खरा कर्मयोगी, कर्मवीर आण्णांच्या विचाराचा वारसा “”खरा रयत सेवक”” म्हणून महेंद्रशेठ घरत यांची वाहवा १४ गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.
अनेक नेते आपल्या मुलांना निवडणुकीत आमदार करण्यासाठी धडपडत असतात परंतु जनसेवेसाठी काया झिजवणारा खरा कर्मयोगी आज समाजासाठी असा नेता मिळणं दुरापास्त आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे