जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त जालना शहर व मतदार संघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, उद्या बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत गोरंटयाल हे श्री गुरु गणेश भवनमधील सभागृहात उपस्थित राहून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
उद्या दि.९ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ८ वाजता शहरातील पाताल हनुमान मंदीरात माजी आमदार कैलास गोरंटयाल व सौ.संगीताताई गोरंटयाल यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात येणार असून ९ वाजता पांजरा पोळ मध्ये चारा वाटप, ९.३० वाजता जुना जालना भागातील कचेरी रोडवरील मारोती मंदिरात अखंड जलधारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री गुरु गणेश भवन मधील सभागृहात उपस्थित राहून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दुपारी ३ ते ४ ही वेळ राखीव ठेवण्यात आली असून सायंकाळी ४ ते उशिरापर्यंत आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जलसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा स्थळी उपस्थीत राहणार आहेत. दि.१० एप्रिल गुरुवार रोजी सकाळी १० वाजता सेवानिवृत्त उपअभियंता एस. एन.कुलकर्णी यांच्या भाग्यनगर मधील निवासस्थानी गोरंटयाल यांचा सत्कार करण्यात येणार आहे.११ वाजता पांजरा पोळ येथे चारा वाटप, दुपारी १२ वाजता अंबड चौफुली येथील राधाबाई अनाथालयात विद्यार्थ्यांना फळ वाटप, १ वाजता घाटी रोडवर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप, रात्री ८ वाजता जुना जालना भागातील शास्त्री मोहल्ला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदीरात गोरंटयाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामनगर साखर कारखान्याजवळील सोमनाथ फाटा येथे पानपोईचा शुभारंभ गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात येणार असून रात्री ८ वाजता शहरातील नूतन वसाहत परिसरात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दरम्यान, माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात कार्यक्रमांना कार्यकर्ते,पदाधिकारी, माजी नगरसेवक,जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा