pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी गावपातळीवर 21 जून रोजी शिबीराचे आयोजन

0 1 1 8 2 2

  जालना/प्रतिनिधी,दि. 20 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत माहे एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ व्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सध्या सुरु आहे. केंद्र शासनाने योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थीने ई-केवायसी (e- KYC) व बँक खाते आधार संलग्न (NPCI Seeding) करणे जमिनीचा तपशील संलग्न करणे (Land Seeding) या बाबी अनिवार्य केलेल्या आहेत.

सद्यस्थितीत जालना जिल्हात ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी सुमारे ६३ हजार ८६५ लाभार्थी तर बँक खाते आधार संलग्न (NPCI Seeding) करण्यासाठी सुमारे २९ हजार ७९६ लाभार्थी प्रलंबीत असल्याने सदरचे लाभार्थी पूर्तते अभावी १४ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सदर कार्यपूर्तता करण्यासाठी गावपातळीवर दि. २१ जून रोजी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. सदरील कॅम्पमध्ये कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी, ई-केवायसी करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) याचे कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत. या दिवशी सबंधित अधिकारी/ कर्मचारी नेमून दिलेल्या गावामध्ये सकाळी ७.३० वाजता उपस्थित राहतील व दवंडी अथवा गावातील सरपंच,पोलीस पाटील, शेतकरी मित्र, प्रगतशील शेतकरी यांचे द्वारे गावात सर्वदूर कामकाज सुरु होत असल्याचा संदेश देतील. ई-केवायसी करण्यासाठी Face Authentication या गुगल प्लेस्टोअरमधील अप्लिकेशन द्वारे नोदणीकृत लाभार्थी यांच्या ओटीपी सहाय्याने १० शेतकरी यांचे ई-केवायसी पूर्ण होईल. गावातील पोस्ट मास्टर यांच्या समन्वयाने प्रलंबित लाभार्थीचे बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी (NPCI Seeding) करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच जमिनीचा तपशील महसूल विभागा मार्फत सलग्न करण्यात येणार आहे. याचा प्रधान मंत्री किसान सन्मान (PMKISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेऊन ई-केवायसी तसेच इतर तपशील अद्ययावत करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जी.आर.कापसे  यांनी केले आहे.

 

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2