नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सराफा, नांदेड येथे आर्य वैश्य समाज नांदेड आयोजीत सुंदर हस्ताक्षर, ब्रेन मॅपिंग & मेमरी डेव्हलप कार्यशाळेचा समारोप ऊत्साहात संपन्न

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.9
नांदेड शहरातील सराफा, नांदेड
येथे नगरेश्वर प्राथमिक विद्यालय येथे
आर्य वैश्य समाज नांदेड आयोजीत सुंदर हस्ताक्षर, ब्रेन मॅपिंग & मेमरी डेव्हलप कार्यशाळेचा आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समारोप संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सुभाषराव कन्नावार यांच्या अध्यक्षतेखालील मा.श्री महेश वडदकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड, मा.सौ. ममता राखाडे उपायुक्त धर्मदाय कार्यालय नांदेड, डॉ.मा.श्री विजय निलावार जेष्ठ पञकार हिंगोली या प्रमुख पाहुण्यांच्या व हस्ताक्षर तज्ञ मा.श्री पांडूरंग चोपडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन चिमुकले मुलीने स्वागत गिताने, मान्यवरांच्या सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
दहा दिवसीय कार्यशाळेत अक्षर सुधारलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त नगरेश्वर प्राथमिक विद्यालय व भारत विद्यालय नांदेड येथील कर्तृत्ववान महिला शिक्षिका,महिला कर्मचारी, महिला पालक यांचा मा.सौ. ममता राखाडे मॅडम यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सुंदर हस्ताक्षराचे महत्व पटवून दिले व मुलाचे कौतुक करून मान्यवरांनी आर्शिवाद दिला.
आज महिला जागतिक दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या मानसन्मान सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच भारत विद्यालयाचे जेष्ठ संचालक मा.श्री नारायणदास कलंञी यांना महाराष्ट्र माहेश्वरी समाज याच्याकडून जिवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा यु टुब लाईव्ह चॉनलचे संपादक मा.चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री एकनाथ मामडे, सहसचिव मा. श्री दत्तोपंत देबडवार, कोषाध्यक्ष मा.श्री शाम गंदेवार, बांधकाम समितीचे अध्यक्ष मा.श्री जगन्नाथ चक्रवार , उपाध्यक्ष मा.श्री दिपक कन्नावार, सचिव मा.श्री अशोक जवादवार, कोषाध्यक्ष मा.श्री प्रकाश मोगडपल्ली, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव मा.श्री गोविंद बिडवई, नगरेश्वर वैश्य मंदिर नादेडचे अध्यक्ष मा.श्री भागवत गंगमवार, मा.श्री चंद्रकांत बासटवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन जेष्ठ पञकार मा.श्री विजय बंडेवार यांनी तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल दाचावार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री सहदेव कापसे,श्री पवन मामीडवार, श्री माधव पानपट्टे व श्री श्रीकांत नल्लावार यांनी परिश्रम घेतले.
असे प्रसिध्दी पत्रक नगरेश्वर प्रथामिक विद्यालय सराफा होळी नांदेड यांनी प्रसिध्दी दिली