pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे  कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.15

जिल्ह्यात दि 24 मार्च 2024 रोजी होळी व दि. 25मार्च रोजी धुलीवंदन सणानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. तसेच रमजान महिना सुरु आहे. दि.29 मार्च रोजी गुड फ्रायडे सण साजरा होणार आहे. तसेच दि. 1 मार्च ते दि. 26 मार्चपर्यंत माध्यमिक शालांत परीक्षा सुरु झाली असून परीक्षा केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको, ईत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने त्या अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन दि.16 ते 29 मार्च 2024 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही.  तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही.  व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही.  आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. हा आदेश दि.16 मार्च रोजीचे 6 वाजेपासून दि.29 मार्च रोजीचे 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे