pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे आषाढि एकादशी निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0 1 2 0 8 0

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.30

महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्ताने
नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे जागृत हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात संख्येने गर्दी केली होती.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विधीवत काकड आरती, महाअभिषेक, महापूजा, महाआरती, प्रसाद झाल्यानंतर भावीकानी दर्शनासाठी दिवसभर मोठ्या प्रमाणा रांगा लावून पांडुरंग रुक्मिणी चे दर्शन घेतले
पांडुरंगाला साकडे घालुन पाऊस चांगल्या प्रकारे होओ भाविकांचे संकट दूर होओ अशी प्रार्थना भाविकांनी केले दर्शनासाठी पुरुष महिला मुलं मुली बालगोपाळांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सायं चार वाजता नगरप्रदक्षिणा नामघोषाने जणु काहि पंढरपूर अवतरले असे वाटत होते महिला मोठ्या संख्येने नामघोषात तल्लिन होऊन फुगड्या खेळुन उत्सव साजरा केला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 8 0