pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा शिक्षक संघटनेचे शिक्षक दिनी, छत्रपती संभाजी नगर येथे तीव्र निदर्शने , शिक्षण उपसंचालमार्फत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन 

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी, दि.5

मराठवाडा शिक्षक संघ यांचे सूर्यकांत विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली असून विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालका मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या. मराठवाडा शिक्षक संघटनेचे आजच्या शिक्षक दिन अन्यायाच्या विरोधात त्याचे शिक्षकांशी होणारे बदनामी टाळण्यासाठी, आमदार प्रशांत बंब हे नेहमी शिक्षकांच्या विरोधी भूमिती घेतात त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निदर्शन करण्यात आली. शिक्षक दिन शिक्षकांचा सन्मान केला जातो. कोणत्याही देशाचा विकास तेथील शिक्षणाची स्थिती आणि अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांचे परिस्थिती यावर तेथील देशाचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे भारत देशात शिक्षकांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्यांना देशाचा शिल्पकार असे म्हटले जाते. शिक्षक दिनी शिक्षकांबद्दल गोडवे गायले जातात माणसांना केला जातो परंतु उर्वरित 364 दिवस शिक्षकांचे कुचेष्टा,इटाळणी बदनामी, सुरू असते. गंगापूर तालुका छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक आमदार हे शिक्षकांवर शिकवत नसल्याचा आरोप करतात त्यांचे पगार बंद करा म्हणतात घरभाडे बंद करा म्हणतात भ्रष्टाचारी असल्याचा ठपका ठेवतात असे बिनबुडाचे चे आरोप करतात. शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील आमदाराबद्दल तीव्र नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. मराठवाडा शिक्षक खंडातर्फे त्यांच्यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांच्यावर बदनामी केल्याचा म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी असेच आमच्या इतर मागण्या या मान्य करावे अशी विनंती एका निवेदनाद्वारे शिक्षक उपसंचालकाला देण्यात आली आहे. शिक्षक संचालक अनिल साबळे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मी शासनाकडे तुमच्या मागण्याचं पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले. आज मराठवाडा शिक्षक संघटनेचे संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षकांचे नेतृत्व करण्याच्या उद्देशाने आज छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकात परिसर दणाणून सोडला. आठवडा शिक्षक संघटनेने शिक्षकांची बदनामी करणाऱ्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रचलित नियमानुसार सर्वच शाळांना 100% अनुदान देण्यात यावे आणि भेट भिकारी संपवावी. सातव्या वेतन आयोगातील तिसरा आणि चौथा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावा. एम पी एस धारक शिक्षकांना तो रुकने देण्यात यावा. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 20 30 अशा तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा जीआर लवकरात लवकर काढावा. शिका तत्वावरील मानधनावर काम करत असल्या प्राध्यापकांना नियमानुसार नियमित करण्यात यावी, राज्यातील 65 हजार शिक्षकांचे रिक्त पदे तात्काळ भरावी. भंडारा जिल्हा परिषदेचा शिक्षकांना स्वयंसेवक करण्याचा ठराव तात्काळ रद्द करावा तो अपमान जनक आहे. शिक्षक पाल्यांना 16 मार्च 2019 चा शासन निर्णय रद्द करून मोफत शिक्षणाचा आदेश लागू करावा. सर्व शैक्षणिक संस्थांना सातव्या वेतन आयोगाच्या पगाराप्रमाणे घेताना तर अनुदान द्यावे. शिक्षण सेवक पद रद्द करून शिक्षकांना नियमित वेतन श्री नेमनुका द्याव्यात शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय परिपूर्ती योजना लागू करावी. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रति योजना लागू करावी. सर्व शिक्षकांचे शिक्षकेतर करणाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे. 77 कर्मचाऱ्यांनी भरती वरील बंदी उठवावी. शालार्थ योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक होणारा विलंब टाळण्यात यावा. सेवानिवृत्त झालेल्या व सेवेत असलेल्या दिवंगत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्व मिळते देण्यात यावी. आश्रम शाळा शिक्षकांचे वेतन घेऊनच करण्यात यावे वार्षिक वेतनवाडी देण्यात याव्यात. इंग्रजी शाळांच्या आरती अंतर्गत देते त्वरित देण्यात यावी. विद्यालय व कनिष्ठ महादेश येथील नैसर्गिक वाढीव पदांना मान्यता देण्यात. इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात यावी. या मागण्या व अनेक मागण्या बैठकीत चर्चा झाल्या त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून मराठवाड्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून सोडण्यात येणाऱ्या सर्व समस्या इथे सोडवण्यात येतील अशा आश्वासन देण्यात आले. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, छत्रपती संभाजी नगर हे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष शिवाजी गुठे, मारुती तेगमपुरे, अनिल पाटील, दत्तात्रय सोनवणे, नवनाथ मंत्री, एफ एस सय्यद, संजय येळवंते, एचपी ठाले, पी आर राठोड, मोहन कदम, अजय कदम, एस एन पवार, अजीम शेख, डी एन महाजन, आर एस दराडे, विलास चव्हाण, पी के जंगले, प्रभाव पाटील, इंडियन शिंदे के एम गोरे, आर्यन सोनवणे, ढमढेरे ए एस, व्ही व्ही केनेकर, श्रीमती कदम, एम एम रामटेके, नजन बिझी, एस ए राठोड, डी डी मातेरे, के व्ही आवाडे, ए क एकलारे, दिनेश पाटील, श्रीमती लोंढे एस डी, ए बी अंबड, धनंजय भवर, टी. बी भवर, आदींच्या सह्या आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2