pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रोजगार मेळाव्यात 24 उमेदवारांची निवड

0 1 2 1 0 7

जालना/प्रतिनिधी,दि. 11

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांच्यामार्फत जालना येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात बुधवार दि.10 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्ह -जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकुण 53 उमेदवारांनी सहभाग नोंदवून ती नियोक्तयाकडे मुलाखती दिल्या यामधून 24 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खाजगी कंपन्या कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. यावेळी कृषीधन सीडस प्रा.लि.जालना यांनी 5 तर नवभारत फर्टीलायझर्स लि.औरंगाबाद यांनी 11 आणि डिस्टील एज्युकेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि. औरंगाबाद यांनी 8 अशी एकुण 24 उमेदवारांची निवड केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास काळे यांनी केले तर अमोल बोरकर, रामेश्वर शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. असेही कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 7