आठ वर्षीय आयुष चंदनचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

अंबड/आनिल भालेकर, दि.21
अंबड येथील आयुष लक्ष्मण चंदन हा आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा पुष्करणी बारवात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 मंगळवार रोजीघडली. याविषयी अधिक माहिती अशी की आयुष चंदन हा आपल्या आजी सोबत पुष्करणी बारवातील पंचमुखी महादेव मंदिरात दर्शनासाठी गेला होता आजी पूजा करत होती आजीने आयुषला पंचमुखी महादेवाला अर्पण करण्यासाठी फुले आणण्यास सांगितले आयुष फुले घेऊन आला मात्र आजीने सांगितले की हे फुले देवाला चालत नाहीत हे फुले फेकून दे आयुष फुले फेकण्यास गेला तो परत आलाच नाही. नेहमीप्रमाणे आजीला वाटले की आजी सोबत आयुष येत असे मंदिरात न थांबता त्वरित निघून जात असे त्याप्रमाणे आयुष्य घरी गेला असल्याचा आजीचा समज झाला. पूजा अर्चा आटोपल्या नंतर आजी घरी निघून गेली मात्र बराच वेळ झाला तरी आयुष घरी परत आलाच नाही हे लक्षात येताच आयुषचा परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र आयुष कुठेच आढळून आला नसल्याने व बराच शोध घेतल्यानंतर कुठेच सापडत नसल्याने सदरची माहिती अंबड पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.दरम्यान आयुषचा मागोवा लागत नसल्याने संपूर्ण अंबड शहरात आजूबाजूला परिसरात तसेच
पंचमुखी महादेव मंदिराच्या पुष्करणीतील बारवात पडण्याचा संशय व्यक्त होत असल्याने आयुष चा शोध पुष्करणी बारवात करण्यात आला मात्र तू कुठेच आढळून आला नाही. दुसऱ्या दिवशी 20 बुधवार रोजी ही शोध घेण्यात आला मात्र आयुष्य 24 तास उलटूनही सापडत नसल्याने परिवार चिंतातूर झाले .दरम्यान दिनांक 21 गुरुवार रोजी पुष्करणी बारवात सकाळी सात वाजेच्या दरम्यान आयुषचा मृतदेह तरंगत असतांना आढळून आला. तिसऱ्या दिवशी सकाळी आयुष्यचा मृतदेह पुष्करणी तरंगत आढळून आल्याची माहिती मिळताच बघणाऱ्याची मोठी गर्दी झाली होती, उत्तरीय तपासणीसाठी आयुष चा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर आयुष्य मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला. एक वर्षांपूर्वी आयुषच्या वडिलांचाही दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता.आयुषच्या अशा दुर्दैवी अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.