एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवासी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 15
एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 18 लक्ष 16 हजार लाभार्थी असुन 6 लक्ष 47 हजार लाभाथ्यर्थ्यांचे आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यामध्ये 11 लक्ष 69 हजार लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड e-KYC करणे बाकी आहे. या करिता आयुष्मान कार्ड e-KYC करून निर्माण करण्याकरिता ग्रामीण भागात गाव निहाय व शहरी भागात वॉर्ड निहाय दि. 16 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025या दरम्यान विशेष मोहिमेद्वारे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार आणि आशा सेविका यांच्याशी संपर्क साधुन आपले आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे.
योजनेचे लाभार्थी :- सर्व रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय, पांढरे) शासकीय, निमशासकीय सर्व कर्मचारी व अधिकारी, आश्रम शाळेतील विद्यार्थी, वृद्ध आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार, समलैंगिक व्यक्ती, 70 वर्षा वरील सर्व जेष्ठ नागरिक हे सर्व या योजनेचे लाभार्थी आहेत.
योजनेचे लाभ :- प्रति कुटूंब प्रति वर्ष पाच लाखा पर्यंत योजनेच्या अंगिकृत रुग्णालया द्वारे मोफत उपचार देण्यात येतील.70 वर्षा वरील सर्व जेष्ठ नागरिक यांना आयुष्मान भारत वय वंदना योजने अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपये पर्यंत योजनेच्या अंगिकृत रुग्णालया द्वारे मोफत उपचार देण्यात येतील.
समलैंगिक व्यक्ती यांना आयुष्मान भारत स्माईल (SMILE) योजने अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपये पर्यत योजनेच्या अंगिकृत रुग्णालया द्वारे मोफत उपचार देण्यात येतील.सफाई कामगार व त्यांच्या कुटूंबातील सदस्य यांना आयुष्मान भारत नमस्ते (NAMSTE) योजने अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपये पर्यंत योजनेच्या अंगिकृत रुग्णालया द्वारे मोफत उपचार देण्यात येतील.
योजनेचे लाभ घेण्याकरिता लागणारे कागद पत्रे :- आयुष्मान कार्ड
आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरिता लागणारे कागद पत्रे :- अद्यावत रेशन कार्ड म्हणजे आधार कार्ड सोबत जोडलेले रेशन कार्ड,आधार कार्ड, आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल.
70 वर्षा वरील नागरिकांना आयुष्मान वंदना कार्ड निर्माण करण्याकरिता लागणारे कागद पत्रे :-
आधार कार्ड,आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल.
समलैंगिक व्यक्ती यांना आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरिता लागणारे कागद पत्रे :-
आधार कार्ड, आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल
अशी माहिती जिल्हा समन्वयक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

