pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णी भाजपचे महासंपर्क अभियान ज्येष्ठ नागरिकांचा गौरव व भेटीगाठी

0 1 7 4 1 4

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.18

टेंभुर्णी : ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के व इतर
देशातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी महा संपर्क अभियान अंतर्गत श्रेष्ठ व्यक्तींची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी टेंभुर्णी शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नववर्षातील विविध योजनांची माहिती देण्यात आली प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जलजीवन मिशन, महिलांना 50 टक्के बस सवलत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना मदत, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 57 लक्ष शेतकऱ्यांना लाभ, याशिवाय प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी शौचालय बांधणे , याशिवाय प्रधानमंत्री श्री योजना अंतर्गत 14 हजार 500 शाळांचा विकास प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 137 कोटी युवक प्रशिक्षित करणे, रोजगार मेळाव्या अंतर्गत एक हजारहून अधिक नियुक्ती पत्राचे वितरण करणे, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत दहा कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण देणे, साडेचार कोटी लोकांना मोफत उपचार जन औषधी केंद्रावरून स्वस्त औषधी उपलब्ध करणे, मेट्रो सुविधा, वंदे मातरम मिशन अशा विविध देशांतर्गतच्या योजनांचा वेगवान आढावा ज्येष्ठ नागरिकांसमोर श्री म्ह स्के यांनी मांडला.

याशिवाय महाराष्ट्रात रेल्वेचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून अकाई ते छत्रपती संभाजीनगर दुहेरीकरणासाठी 960 कोटी, आकाई मुदखेड विद्युत करणाअंतर्गत जालनापर्यंत विद्युतीकरण, जालना मुंबई रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, अकोला पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण , रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणासाठी निधी, जालना येथील पिट लाईनच्या कामासाठी शंभर कोटी रुपये, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तेराशे कोटीची तरतूद याशिवाय लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे मातरम रेल्वे बनवण्यास सुरुवात , जालना ते जळगाव नवीन रेल्वे लाईन निर्मिती व जालना खामगाव रेल्वे नव्याने सर्वे याशिवाय जालनातून उत्तर भारतीयांसाठी जालना छपरा तर तिरुपती बालाजी साठी जालना तिरुपती नवीन रेल्वे सुरू करण्याचे काम श्री दानवे यांनी केल्याचे शालिग्राम मस्के यांनी सांगितले याशिवाय जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये साडेसात हजार कोटी रुपयांचे रस्ते जालना शहरातील अंतर्गत रस्ते सिमेंट करण ड्रायफूट साठी पाचशेखर जमिनीवर उभारणी आयसीटी कॉलेज राजुर गणपती तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 30 कोटी रुपयांची कामे पूर्णत्वास याशिवाय अमृत अभियान योजनेअंतर्गत मल निसर्ग प्रकल्प उभारण्यासाठी 85 कोटी मंजूर करण्यात आले यामुळे जेष्ठ नागरिकांनी केंद्र शासन व जालना लोकसभेचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कामाची अवलोकन करून आगामी काळात भारतीय जनता पार्टी सोबत सक्षमपणे उभे राहावे असे आवाहनही श्री मस्के यांनी केले याप्रसंगी त्यांनी टेंभुर्णीतील उद्योगपती नंदलाल काबरा निवृत्त नायब तहसीलदार मुबारक चाऊस व्यावसायिक देवसिंग गायकवाड डॉ. विजय शिंदे, डॉ. अविनाश सुरसे, ज्येष्ठ संचालक निवृत्त मुख्याध्यापक मधुकर निकम, बाळू मापारी या नागरिकांच्या घरी भेटी दिल्या याप्रसंगी श्री म्हस्के यांच्यासोबत माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, दत्तू पंडित, सर्जेराव कुमकर, उद्धव दूनगहू, शहराध्यक्ष राजू खोत, संजय राऊत, बाबुराव जाधव, फैसल चाऊस, मधुकर देठेन,मनोज शिंदे,किशोर कांबळे,संजय डोईफोडे,, दत्ता सोनसाळे, दीपक जमधडे ,रंगनाथ जमधडे, ताहेर चाऊस
यांची उपस्थिती होती,

शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिला जात असून देश पातळीपासून गाव पातळीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकासात्मक कामांचा आलेख वाढतच आहे याशिवाय केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून जालना लोकसभेचा चेहरा मोहरा बदलला असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी बदललेल्या विकास आपल्या माध्यमांतून जनसामान्यापर्यंत पोहोचावा .
– शालिकराम म्हस्के , जिल्हा परिषद सदस्य

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे