pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून जालना येथे विविध प्रशिक्षणाचे 10 जुलैपासून आयोजन

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.5

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जालनाकडून जालना येथे पाच दिवसीय ऑनलाईन पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, गाय- म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे  दि.10 ते 14 जुलै 2023 या  कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसह इच्छुकांनी प्रवेश अर्ज रविवार दि.9 जुलै 2023 पुर्वी सादर करावेत, असे आवाहन जालना येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी  उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण करावा हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराबाबत उपलब्ध  बंदीस्त शेळीपालन ज्यामध्ये शेळीपालनाची सद्यस्थिती, शेळ्यांच्या विविध जाती व निवड, आदर्श गोठा, शेळ्याचे प्रमुख आजार व लक्षणे, प्रतिबंधक उपाय व उपचार, शेळ्याचे संतुलित आहार, गाभण शेळ्याचे व करड्याचे संगोपन इत्यादीचे सखोल मार्गदर्शन याशिवाय उद्योजकता प्रशिक्षण  ज्यामध्ये उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयं मुल्यांकन (मी कोण आहे), उद्योग उभारणीचे विविध टप्पे, आपल्या कामासाठी कुठे संपर्क करावा, उद्योग व्यवसायाची निवड, उद्योग संधी, उद्योग व्यवस्थापन, बाजार पेठ व्यवस्थापन, मार्केटिंग व संभाषण कौशल्य, विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज विषयक माहिती,  राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, यांचे कार्य व योजनांविषयी माहिती लघु उद्योग नोंदणी कर्ज व सादरीकरण व प्रक्रिया, उद्योग संदर्भात कायदे, शासकीय कर्ज योजनांची माहिती व सवलतीबाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान इयत्तासातवी  पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.9 जुलै 2023 पर्यंत प्रकल्प अधिकारी विनोद तुपे,  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जालना  द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं. पी-7 अतिरिक्त औद्योगिक वसाहत जालना मो.७३५०४१८४९२ येथे संपर्क करावा. असे आवाहन डी.यु.थावरे, विभागीय अधिकारी, एमसीईडी, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे