pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

एमएचटी-सीईटी -2024 या सामाईक प्रवेश परीक्षेचे जिल्ह्यातील 4 परीक्षा उपकेंद्रावर आयोजन

0 1 7 5 2 8

जालना/प्रतिनिधी,दि.19

 शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत असते. तरी एमएचटी-सीईटी -2024 या सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन जालना जिल्ह्यातील एकुण 4 परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आले आहे. अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानूसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी-2024 या जालना जिल्ह्यातील जालना येथील जेईएस बागडीया महाविद्यालय, मत्सोदरी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, बदनापूर येथील व्ही.एस.एस. इन्सि्टट्युट ऑफ फार्मसी या उपकेंद्रावर दि. 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 व दि. 2 मे ते 17 मे 2024 या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे.

आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे स्तरावरुन जालना केंद्रासाठी दोन जिल्हा संपर्क अधिकारी यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही परिक्षा ऑनलाईन पध्दतीने होत असल्यामुळे जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या समन्वयाने सबंधित उपकेंद्रांवर वर्ग-1/वर्ग -2 चे एकुण 7 अधिकाऱ्यांची परिक्षा केंद्र ठिकाण अधिकारी म्हणुन व 4 वर्ग 1, वर्ग 2 चे अधिकारी यांची राखीव परिक्षा केंद्र ठिकाण अधिकारी म्हणुन नेमणुक आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक जालना यांना या केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.  परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा खंडीत न करण्याकरीता कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत महावितरण कंपनी, मस्तगड, जालना यांना पत्र देण्यात आले आहे.

सर्व परीक्षा उपकेंद्रावर सदरील कालावधीसाठी एक रूग्ण वाहिनी व वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात करीता सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. परीक्षा उपकेंद्राना भेटी देणे व उपकेंद्रावरील अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जालना यांची भरारी पथक प्रमुख म्हणुन नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयीन स्तरावर वर्ग -1,  वर्ग-2 चे दोन अधिकारी यांची निरीक्षक म्हणुन तसेच वर्ग- 3, वर्ग- 4 चे तीन कर्मचारी सहाय्यक म्हणुन नियुक्त करण्यात आले आहेत. सदरील उपकेंद्रावर जाणे-येणे सुलभ व्हावे या दृष्टीने आपण आपल्या महामंडळाची परिवहन सेवा परिक्षा सुरु होण्यापुर्वी किमान 4 तास व पुरेश्या प्रमाणात विनाअडथळा परिक्षार्थीना उपलब्ध राहील या बाबतचे निर्देश महाराष्ट्र परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे