pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठा आरक्षणासाठी उपोषण काळातील दुर्घटनेत जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लक्ष अर्थसहाय मंजूर 

0 1 2 1 1 1

जालना/प्रतिनिधी,दि. 3

 मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरीता अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण काळातील दुर्घटनेदरम्यान जखमी झालेल्या 22 व्यक्तींच्या उपचारावर झालेल्या खर्चासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून रू. 25,23,375/- (रू. पंचवीस लाख तेवीस हजार तीनशे पंचाहत्तर फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

सदर जखमी झालेल्या व्यक्तींवर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट येथे दि. 3 सप्टेंबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत उपचार करण्यात आले होते.

सदरहू मंजूर अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असलेल्या मुंबई शाखेतून जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे, स्टेट बँक ऑफ इंडिया, शहागंज, छत्रपती संभाजीनगर शाखेतील बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 1