pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

23 फेब्रुवारीपासून अनाथ बालकांसाठी पंधरवडा आयोजित

0 1 7 4 0 5

 जालना/प्रतिनिधी,दि.22

जालना जिल्ह्यात अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र आदि उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च  2024 या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला , अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करून देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवडा राबविण्यासंबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात देखील सदर पंधरवडा राबविण्यात येणार असुन अनाथ मुलांना वरील प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधुन सदरील प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे एक समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी अनाथ बालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सदर समर्पित कक्षास   दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी व पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे