ब्रेकिंग
अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

0
3
8
3
5
2
जालना/प्रतिनिधी,दि.29
घनसावंगी : तालुक्यातील अंतरवाला बुद्रुक येथील शिवसेना शिंदे गटआणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा नेते सतीश घाटगे पाटील यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रभाकर धांडे, बाबासाहेब हरबक, लक्ष्मण काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंतरवाला बुद्रुक येथील सुरेश माकोडे , शैलेश तांगडे, रामा तांगडे, आतिक शेख, अझर सय्यद, दीपक माकोडे,
माऊली माकोडे, गोपाल माकोडे, गोविंदा माकोडे, गौतम घोगरे, दत्ता खामकर, कैलास माकोडे, पंढरी टोम्पे, अमोल घोगरे , मनोहर टोम्पे , अमोल घोगरे,
अशोक टोम्पे, शरद टोम्पे , मनोहर जाधव, अशोक काळे यांच्यासह आदीनी सतीश घाटगे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. सर्वांचे सतीश घाटगे यांनी पक्षात स्वागत करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्ष प्रवेशामुळे अंतरवाला बुद्रुक येथे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे.
0
3
8
3
5
2



