pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

इंदिरा गांधी महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व़ स्पर्धा संपन्न

0 1 7 4 1 0

जालना/प्रतिनिधी,दि 11

  भारत सरकार व  युवा खेल मंत्रालय यांच्या अंतर्गत चालणारे नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व युवा बहुउददेशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे माझा भारत विकसित भारत @२०४७  या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व़ स्पर्धा पार पडली.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ. राजेंद्र गायके, प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके, संयोजक डॉ. सोमीनाथ खाडे, डॉ. भीमराव वाघ, डॉ. विठ्ठल गाडेकर, परिक्षक म्हणुन डॉ.बी.वाय कुलकर्णी, राधेश्याम राजपुत, प्रा.लहुजी दरगुडे, प्रा.तिडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल प्रा.सोमीनाथ खाडे यांनी केले. तसेच स्पर्धेत  जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विषयावर मत मांडले. आपली जबाबदारी व लोकशाही मधील विविध असणाऱ्या त्रुटी दूर करून समाजाने एक संघ होऊन पुढे गेले तर आपण नक्की २०४७ मध्ये विकसित देशाच्या रांगेत  नक्की जाऊया असेही मत मांडले. स्पर्धेत प्रथम बक्षीस आदिती सुरंगळीकर, द्वितीय शुभम एकनाथ शिंदे तर तृतीय शिवानी बाळासाहेब सिरसाट यांनी पटकाविले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयपाल राठोड, प्रिती झिने, रवी दळे, वैभव कांगणे आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास  महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. असे जिल्हा युवा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे