ग्रामपंचायत बांधपाडा(खोपटे) येथील पोट-निवडणुकीत शिवसेनेचे रितेश सदानंद ठाकूर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.
नवनिर्वाचित उपसरपंच रितेश सदानंद ठाकूर यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
बांधपाडा(खोपटे) ग्रामपंचायत उपसरपंच सुजित म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते, या उपसरपंच निवडीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व तालुका संघटक बी.एन डाकी यांच्या आदेशानुसार रितेश ठाकूर यांना उमेदवारी दिली गेली, तसेच उपसरपंच पदासाठी त्यांचा शिवसेना,काँग्रेस आघाडी तर्फे अर्ज दाखल केला.पण ग्रामपंचायत सदस्य देवानंद ठाकूर यांनी सुद्धा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे रितेश ठाकूर हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले.त्याबद्दल खोपटे पंच-क्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपसरपंच पदी निवड होताच सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी नवनिर्वाचित उपसरपंच रितेश ठाकूर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन व रितेश ठाकूर यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यस शुभेच्छा दिल्या.
तसेच उपसरपंच झाल्यावर रितेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,तालुका संघटक व अवजड वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष व तालुका संघटक बी. एन डाकी,गटनेते गणेश शिंदे, शिवधन पतपेढी,चिरनेरचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, तालुका संघटिका व सरपंच भावना म्हात्रे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाध्यक्ष धीरज बुंदे, शहर संघटक महेश वर्तक, सरपंच प्रीती पाटील, खासदार प्रतिनिधी अजित ठाकूर, शाखाप्रमुख विश्वनाथ पाटील,शाखाप्रमुख बाळकृष्ण ठाकूर, शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर, काँग्रेस वरिष्ठ केशव घरत, भालचंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच सुजित म्हात्रे ,ग्रामपंचायत सदस्या जागृती घरत, करिष्मा ठाकूर, भावना पाटील, शुभांगी ठाकूर, राजश्री पाटील, मीनाक्षी म्हात्रे, अविनाश ठाकूर, देवानंद पाटील, प्रीतम पाटील, लक्ष्मण ठाकूर, चिरले गावचे उपसरपंच समाधान माळी, अभिजित म्हात्रे, अक्षय ठाकूर ,विश्वास ठाकूर, दीपक घरत, मेहुल ठाकूर, नंदकुमार ठाकूर, ऋतिक ठाकूर, मंथन म्हात्रे, वंश म्हात्रे, सरोज ठाकूर, मयूर घरत, अभिजीत ठाकूर, विनीत भगत, विक्रांत म्हात्रे, ऋषिकेश ठाकूर, कुणाल ठाकूर, सुरेश ठाकूर,रोहित पाटील, अतुल ठाकूर,सुशांत ठाकूर, विपुल ठाकूर, राजू ठाकूर,साहिल पाटील, सत्यजित पाटील,ग्रामविस्तार अधिकारी रवी म्हात्रे, तसेच गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.