pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

अर्चना सोनार यांच्या उपक्रमाचे कौतुक

0 1 7 4 7 4

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.16

पुणेः- येथील स्त्रीशक्ती फाउंडेशन अंतर्गत अध्यात्मिक गजानन बालसंस्कार केंद्राच्या वतीनेआॕनलाईन राज्यस्तरीय “रामरक्षा स्तोत्र”स्पर्धा संयोजिका अर्चना सोनार यांनी आयोजित केली होती.त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्त्रीशक्ती फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी बालकांना योग्य संस्कार जडावेत या उद्देशाने रामनवमी पर्वकाळाचे औचित्य साधुन नुकतीच लहान मुले,मुली यांचेसाठी “आॕनलाईन रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा”आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी एकुन ८९व्हिडियो आले होते. परिक्षकांनी त्यामधुन १२स्पर्धक निवडले.या स्पर्धेत६ विजयी स्पर्धकांना क्रंमाक देऊन बक्षीस जाहीर केले .स्पर्धेत प्रामुख्याने प्रथम -आयुष सुशील ओझरकर (इयत्तासहावी),द्वितीय- आरोही विनोद पाटील(Lkg) व ऋग्वेद दिनेश येवले(इयत्ता दुसरी),तृतीय-चिन्मया गिरीश चौधरी (Ukg)व ओवी मयूर कुलकर्णी (इयत्ता तिसरी)तसेच उत्तेजनार्थ-निनाद सुशांत जोशी (इयत्ता पाचवी) या स्पर्धकांना बक्षीसे जाहीर केली.तर उर्वरीत ५४ सहभागी उत्तम स्पर्धकांनाही सर्टीफिकेट (प्रमाणपत्र) देण्यात येतील.असे घोषित केले.
या संपन्न झालेल्या ‘रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणुन दिपक जडे,अनंतराव उंबरकर,दिनेश येवले,आत्माराम ढेकळे,अनिल उंबरकर हे मान्यवर होते.परिक्षक म्हणुन प्रकाश जोशी, सौ.दिपाली भांडेकर यांनी काम पाहिले. आयोजिका सौ.अर्चना सोनार यांनी मान्यवरांचा व परिक्षकांचा परिचय देऊन स्वागत केले.स्पर्धेचे सुत्रसंचलन सौ.सिध्दी गणेश मानकर यांनी उत्कृष्ट सांभाळले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी व्यक्त केले की,अध्यात्मज्ञानाचा विसर पडु नये या उद्देशाने स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या वतीने सातत्याने बालकांना योग्य संस्कार मिळावेत या हेतुने विविध उपक्रमांचे प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे आयोजिका योगगुरु अर्चना सोनार यांचे प्रयत्न असतात. त्यांच्या कार्याची व्याप्ती गगनभरारी माध्यमातून विविध प्रदेशात झाली.आहे.या स्पर्धेत अगदी लहान मुलांनी ‘रामरक्षा स्तोत्र ‘उत्कृष्ट शैलीतुन मनमोहक सादरीकरण केले.त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परिक्षक प्रकाश जोशी म्हणाले की,रामरक्षा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच लहान स्पर्धक कौतुकास पात्र आहेत.सर्वांचे पाठांतर व उच्चार अतिशय चांगले आहेत.तसेच या सर्व मुलांवर संस्कार करणारे त्यांचे आई-वडील पण कौतुकास पात्र आहेत.या स्पर्धा आयोजिका योगगुरु अर्चना सोनार यांच्या उत्साहाने यशस्वी संपन्न झाल्या..त्यांचेही मनस्वी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.या आॕनलाइन कार्यक्रमात रुग्वेद सुवर्णवार्ताचे संचालक दिनेश येवले यांनी मार्गदर्शन करुन आभार प्रदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे