सरस्वती भुवन प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी,दि.29
नेहरू युवा केंद्र व सरस्वती भुवन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त सरस्वती भुवन प्रशाला येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महाजन, पर्यवेक्षक श्री. नंद व क्रीडा विभागाचे श्री. जहागीरदार यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा विभागाचे श्री जहागीरदार यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व माजी भारतीय फील्ड हॉकीपटू आणि कर्णधार ध्यानचंद. ते भारत आणि संपूर्ण जगातील अव्वल हॉकी खेळाडूंपैकी एक आहे. ते भारतीय हॉकी संघाकडून खेळले ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. भारतात त्यांच्या जन्मदिवसाला “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून ओळखले जाते. त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून संबोधले जाते. त्यांच्या खेळण्याच्या कारकिर्दीत त्यांनी 1000 हून अधिक गोल केले. खेळपट्टीवर खेळताना चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटत असे. 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला असे मार्गदर्शन केले. विद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त 100 मी. धावणे स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.