pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.4 

जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर, जिपचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उदयसिंग राजपूत, अन्न व औषध सहा. आयुक्त निखील कुलकर्णी, वैधमापनचे श्री. दराडे बीएसएनएलचे प्रदिपकुमार इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनीधी श्री. बोराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे फारुक शेख, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांच्यासह अशासकीय सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुत्रावे म्हणाल्या की, दैनंदिन व्यवहारात ग्रामीण भागतील नागरिकांना येणाऱ्या अडचणी किंवा समस्याची माहिती घेवून, त्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने सक्रिय भूमिका घेतल्यास, ग्रामीण भागातील ग्राहक केवळ फसवणुकीपासून वाचणार नाहीत, तर ते जागरूक आणि सक्षम नागरिक म्हणून त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास तयार होतील. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. याकरीता जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीमद्वारे प्रयत्न करावे. ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी अनेक विभागानी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा वापर करुन ग्राहकांनी ऑनलाईन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.
तसेच राशन दूकानदारांनी ग्राहकांना ई-पॉस मशीनद्वारे नियमानुसार धान्य वितरीत करुन त्यांना पावती द्यावी. तसेच सण व उत्सावाचा कालावधीत अन्न् व औषध प्रशासनाने एमआयडीसी कॅन्टीन मधील अन्न पदार्थाची तपासणी करावी. महावितरण विभागा संबंधी ग्राहकांनी https://www.mahadiscom.in/en/consumer/ या संकेतस्थळावर आपल्या तक्रारीं नोंदवाव्यात. तसेच सर्व संबंधीत विभागांनी त्यांच्याशी संबंधीत तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी श्रीमती सुत्रावे यांनी दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच ग्राहकांच्या संबंधाने काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास, त्याकरीता जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्याचे jalna.nic.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल (फॉर्म) सुविधा उपलब्ध करुन दिली असुन, ग्राहकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे