pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत आस्थापनेच्या दर्शनी भागात समितीचा फलक लावण्याचे आवाहन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.18

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गठीत तक्रार समितीचा आस्थापनेच्या दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून अधिनियमाचे कलम 19 (बी) अन्वये सदरील समितीचा फलक आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावा. तसेच फलक लावल्याबाबतच्या छायाचित्रासह अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जालना कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अनुषंगाने शासन निर्णयान्वये प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये, खाजगी क्षेत्र, संघटना, एन्टरप्राईजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा वितरण, विक्री, यासह वाणिज्य, व्यवसाईक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषागृहे, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इत्यादी ठिकाणी सदर अधिनियमाचे कलम 6 (1) अन्वये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अंतर्गत तक्रार समिती स्थापन नसेल तर रक्कम रुपये पन्नास हजार इतक्या दंडास पात्र आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 19 जुन 2014 प्रमाणे अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून अधिनियमाचे कलम 19 (बी) अन्वये सदरील समितीचा फलक कार्यालयाचे दर्शनी भागात लावण्यात यावा दर्शनी भागात लावण्यात येणाऱ्या फलकावर कार्यालयाचे नाव, सदरील अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा आदेश क्रमांक व दिनांक, अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नावे, पत्ता व संपर्क क्र., कायदयातील तरतुदीचा भंग केल्यानंतर कलमानूसार असलेला दंड व शिक्षा, वुमन हेल्पलाईन नंबर -181 एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम नंबर-112, कार्यालयाचा दुरध्वनी क्र., नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक आदी बाबींचा दर्शनी भागात लावण्यात आलेल्या फलकामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे