pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जपान मध्ये आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे सर्वश्री समिर पाटील यांना यशस्वी उद्योजक चा अवार्ड

0 1 1 8 0 7

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.10

भारतात अनेक प्रतिभाशाली उद्योजक झालेत व होत आहेत. पण या सर्व मध्ये सर्वात कमी वयात सर्वात जास्त यशस्वी झाला आहे तो म्हणजे आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे संस्थापक समिर पाटील. या आगरी युवकांनी वयाच्या २२ व्या वर्षी आर्यन ग्रुप आँफ कंपनी ची स्थापना केली व ५ वर्षाच्या आत ही कंपनी बंदर,गोदी क्षेत्रात मालाची ने- आण करणारी व्यवसायातील धाडसी कंपनी बनली.अशा या आर्यन ग्रुप आँफ कंपनीचा सन्मान जपान येथे टाटा समूहाच्या माध्यमातून मंगळवारी ( दि७) उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी उद्योजक म्हणून समिर पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील चिर्ले या लहानशा खेडेगावातील चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांच्या घरी समिर पाटील यांचा जन्म झाला.शाळा,काँलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण नोकरी न करता उद्योग क्षेत्रात उतरावे या महत्वकांक्षी संकल्पनेतून समिर पाटील या आगरी युवकांनी आर्यन ग्रुप आँफ कंपनीची स्थापना २००४ साली केली.आज बंदर,गोदी क्षेत्रात मालाची ने- आण करणारी व्यवसायातील धाडसी कंपनी बनली असून समिर पाटील या तरुणांनी खेड्यापाड्यातील अनेक तरुणांना आपल्या आर्यन ग्रुप आँफ कंपनीत रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यांच्या या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल बंदर,गोदी येथील टाटा समूहाच्या जपानी शिष्टमंडळाने घेऊन आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे संस्थापक समिर पाटील यांना यशस्वी उद्योजक म्हणून यशस्वी उद्योजकांचा अवार्ड मंगळवारी ( दि ६) जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देऊन गौरविण्यात आले आहे.समिर पाटील या आगरी युवकांनी देश पातळीवर नव्हे तर परदेशातही आपल्या कंपनीचा यशस्वी उद्योजक म्हणून डंका वाजवल्याने अनेक व्यावसायीक, उद्योगपती,उरण तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 7