pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण तालुक्यात बारणे यांना मताधिक्य मिळवून देणार -प्रवीण घासे

0 1 7 9 2 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराला मोठा वेग आला आहे या मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे दरम्यान विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे,खासदार आप्पा बारणे आणि आमदार महेश बालदी साहेबांनी केलेल्या विकासामांच्या जोरावर आम्ही उरण तालुक्यात मोठा मताधिक्य मिळवू,भारत देशाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी देशात पुन्हा एकदा मोदी साहेब पंतप्रधान होणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही मावळ मधून श्रीरंग आप्पा बारणे यांना पुन्हा विजयी करणारच आणि त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, मोदी साहेबांनी देशात केलेला विकास आणि देश हिताचे घेतलेले निर्णय आम्ही जनतेसमोर मांडत असून आम्ही हक्काने मतदान मागत आहोत आणि तसा प्रचंड प्रतिसाद देखील जनतेचा मिळत आहे असे मतं भाजपा युवा अध्यक्ष प्रवीण घासे यांनी प्रचारा दरम्यान मांडले,उरण पूर्व विभागात भारतीय जनता पक्षाचे विभागीय युवा अध्यक्ष प्रवीण घासे यांनी खासदार बारणे यांच्या विजयासाठी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे, प्रवीण घासे यांचा दांडगा जनसंपर्क या भागात असल्याने चिरनेर आणि आवरे या दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघातून मोठी आघाडी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्याचा निर्धार भाजपा युवा अध्यक्ष प्रवीण घासे यांनी केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे