डॉ. प्राजक्ता सिंदखेडकर पाटील यांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

जालना/प्रतिनिधी, दि.24
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषद जालना येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग दुरीकरण समिती जालना यांच्यामार्फत सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन डॉक्टर प्राजक्ता किरणराव सिंदखेडकर पाटील यांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जगदीश मिनियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ जी एम कुंडलिकर, तसेच आय एम ए सदस्य डॉ आनंद बोरीवाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद येथे सर्व मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते