pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे  9 ते 10 डिसेंबरपर्यंत  जालना येथील नुतन महाविद्यालयात आयोजन

0 1 7 4 0 8

  जालना/प्रतिनिधी,दि.5

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दर वर्षी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवासाठी जिल्हास्तरीय संघ निवडण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक -युवतींकरीता जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दि. 9 ते 10 डिसेंबर 2023 रोजी नुतन महाविद्यालय, जुना जालना येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण युवक- युवती, संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, युवक मंडळे, नामाकित कलाकार, संस्थांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये घेण्यात येणाऱ्या कला-बाव व स्पर्धकांची संख्या व वेळ पुढीलप्रमाणे आहे. सांस्कृतिक (समुह लोकनृत्य 10 कलाकार, वैयक्तीक सोलो लोकनृत्य 5 कलाकार, लोकगीत 10 कलाकार, वैयक्तीक सोलो लोकगीत 5 कलाकार) कौशल्य विकास (कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), फोटोग्राफी सहभागी संख्या प्रत्येकी 2 कलाकार,  संकल्पना आधारित स्पर्धा (महाराष्ट्र राज्यासाठी : 1) तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर 2) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान सहभागी 35 कलाकार)  युवा कृती (हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रोडक्ट प्रत्येकी 7 कलाकार)अशी राहील. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संतोष वाबळे7588169493 यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी, कलावंतानी आपले प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरून दि. 8 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत.

युवा महोत्सवातील स्पर्धेबाबत सुचना, नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये  स्पर्धांसाठी,कलाकाराचे, सहकलाकार, साथसंगत देणारे यांचे वयोगट 15 ते 29 असा राहिल, दि. 12 जानेवारी 2024 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावे. दि. 12 जानेवारी 2009 पुर्वीचा दि. 12 जानेवारी 1995 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.  प्रवेशिकेसोबत जन्म तारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.  मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही. लोकनृत्य सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित कलाकारांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल, नृत्य दिग्दर्शन, पोशाख, मेकअप, संच, एकत्रीत परिणाम याबाबीवरून काढण्यात येईल. लोकनृत्य पुर्वध्वनीमुद्रीत टेप, कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.  लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे तसेच लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

 वेशभूषा व शैलीदार नृत्य, संकल्पना, वेळ मर्यादा, कल्पकता याचा गुणांकनासाठी विचार करण्यात येईल. एखादी स्पर्धा सुरू असतांना विद्युत पुरवठा बंद झाल्यास स्पर्धा आहे त्या परिस्थितीत चालू ठेवावयाची किंवा सुरूवातीपासून घ्यावयाची या बाबतचा निर्णय आयोजन समितीचा राहिल. युवा महोत्सवातील कला प्रकारात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना परिक्षकांचा निर्णय अंतिम मानावा लागेल. परिक्षकांबाबत कुठलाही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह 500 रूपये भरून त्याच ठिकाणी आक्षेप सिध्द करावा लागेल. संयोजकामार्फत विद्युत पुरवठा व रंगमंचाची व्यवस्था करण्यात येईल. बाकी सर्व आवश्यक साहित्य त्या त्या स्पर्धकांनी सोबत आणावे लागेल. एखादी स्पर्धा त्या स्पर्धाच्या संकल्पनेनुसार सादर होत नसल्यास ती स्पर्धा थांबविण्याचे अधिकार संयोजक समितीचे राहतील युवा महोत्सवातील संख्या ही साथ संगत देण्यासह असल्यामुळे वेगळे साथ संगत घेता येणार नाही.  सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज सोबत दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा.  कथा लेखन मधील कथा ही पूर्व प्रसारीत झालेली नसावी. फेसबुक, सोशल मीडिया, पुस्तक इत्यादीमध्ये प्रसिध्द झालेली नसावी. प्रवास, निवास, भोजन सर्व स्पर्धकांनी स्वतः करावयाचा आहे. असेही प्रसिद्वीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे