pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लासुर स्टेशन येथे गीताबन कला महोत्सवाचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सरपंच मीना पांडव यांचा अभिनव उपक्रम.

0 1 7 4 1 0

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.19

शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त ”गीताबन कला महोत्सव” स्पर्धेचे आयोजन दि. 18 व 19 जानेवारी रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत प्राथमिक गट इयत्ता ५वी ते ७वी, माध्यमिक गट व विद्यालय गट इयत्ता ८वी ते १२ वीती शिकणाऱ्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात अशी माहिती आयोजक तथा ग्राम पंचायत सरपंच मीनाताई पांडव यांनी दिली. गंगापूर खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच विद्यालय स्तरावरील ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना आपली कला सादर करता यावी यासाठी गंगापूर- खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त गीताबन कला महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता ५वी ते ७वी, इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकणाऱ्या गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विध्यार्थ्यांसाठी समोहिक गीत गायन, समोहिक नृत्य, वैयक्तिक नृय, वैयक्तिक गीत गायन (सर्व भारतीय) अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना रोख अनुक्रमे पाच हजार 355, तीन हजार 330, दोन हजार 223 तसेच उत्तेजनार्थ एक हजार 53 रुपयांची अशी 40 पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आजपासून ते दि. ९ जानेवारी पर्यंत संदीप गायकवाड ९४०४४८७७७९, कल्पेश गायकवाड ७०२०७८७३३४, अजय भिसे ८५५०९७८९०२, प्रकाश कोकरे ९८६०६५१४७४, नितीन गायकवाड ९८८१८६८६१८ या नंबर वरती कला प्रकार सांगून शाळेचे नाव, शाळेचे ओळखपत्र व इयत्ता सांगून नाव नोंदणी करू शकतात.
गंगापूर – खुलताबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या अंगातील कला सादरीकरण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ असणार असून दोन्ही तालुक्यातील शिक्षक वृन्दाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन सरपंच तथा आयोजक मीनाताई पांडव यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे