pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कै.सौ. संगिता मुरलीधर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजूंना कपडे वाटप.

मित्राच्या सुख दुःखात सहभागी होत कपडे वाटून केली समाजसेवा.

0 1 7 4 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

मुरलीधर पाटील (पनवेल )व एस.आर.तोगरे (उरण )हे वेगवेगळ्या कार्यालयात सरकारी कर्मचारी पण एकमेकांचे विचार, वर्तन आणि व्यवहार समान असल्याने त्यांचे घट मैत्रीत रुपांतर झाले.उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरेचा पिंड सेवा करण्याचा, जनसेवा करताना निस्वार्थपणे स्वतःला वाहून घेण्याचा. त्यांनी कोणत्याही राजकीय, पक्षीय, शासकीय अथवा सामाजिक संस्थांचा किंवा मंडळाचा आधार न घेता महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातील 96 सरकारी रुग्णालयात व आरोग्य शिबिरासाठी विविध 51 नोंदणीकृत सामाजिक संस्थाना आज पर्यंत 1,87,56,300/- रुपये किंमतीची औषद्ये दान देऊन एक अपुर्व विक्रम केलेला आहे. तसेच 6 जिल्ह्यातील काही गरीब गरजूंना त्यांच्या वाड्या- पाड्यावर जाऊन नवे- जुणे सर्व प्रकारची कपडे दान आणि 3 जिल्ह्यातील काही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे दान दिलेले आहे. या पुर्वी संग्राम तोगरे यांनी मुरलीधर पाटील यांच्या पनवेल मधील चिंचवणच्या दोन आदिवासी पाड्यावर कपडे दान केले होते. मध्यंतरी मुरलीधर पाटील(चिंचवण, पनवेल )यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे समजल्याने संग्राम तोगरे यांना धक्का बसला व त्यांच्या स्मरणार्थ काही तरींं आगळे वेगळे केले पाहिजे या उदात्त हेतुने त्याच गावी दीन-हिणांना, गरीब -गरजुना वस्त्र दान करण्याचा संकल्प करून मुरलीधर पाटील यांच्याकडे मनोदय व्यक्तं केला. मुरलीधर पाटील यांनी तत्काळ मान्यता दिली .सदर प्रसंगी आदिवासी वाडी, गहाणवाडी व लेंडेवाडी तील अंदाजे 200 महिला- पुरुष-मुले- मूली यांना कपडे वाटप करण्यात आले.मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई संग्राम तोगरे व महाराष्ट्र शासन पुरस्कृत जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे यांनी कै.सौ. संगिता मुरलीधर पाटील यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक झाले व दिप प्रज्वलन करून पुष्पमाला वाहिले. यानंतर उमाजी पवार सदानंद खुटले, चिंचवणचे सरपंच पद्माकर कातकरी, सतिष नरवडे, हेमंत पाटील,सुदर्शन भोईर, पांडूरंग भोईर, नंदू गोंधळी यांना आत्माराम घरत यांच्या हस्ते गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत केले व या सर्वांच्या उपस्थितीत संग्राम तोगरे व सुमन तोगरे आणि उमाजी पवार यांनी कपडे दान केले. श्री.हेमराज, श्री.लखन, घनशाम व अनिता पाटील यांनी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे