pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा नवघर तर्फे साजरी

0 1 7 4 1 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 23

अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा नवघर तर्फे साजरी करण्यात आले. सर्वप्रथम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करून सर्वांनी साहेबांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर नवघर गावातील अंगणवाडी शाळामधील सर्व लहान मुलांना शिवसेना शाखा नवघर तर्फे खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नवघर मधील ग्रामसेवक अधिकारी जी. के म्हात्रे , उपसरपंच विश्वास तांडेल, नवघर मधील शिवसेनेचे मार्गदर्शक तसेच माजी उपसरपंच रवींद्र कृष्णा भोईर , नितीन शेठ मढवी, युवा उद्योगपती रवींद्र पाटील, शाखाप्रमुख अविनाश एकनाथ म्हात्रे , ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर तांडेल ,एकनाथ म्हात्रे, प्राथमिक शाळा नवघरचे शिक्षक भारत पाटील , शिवसैनिक संतोष घरत, युवा शिवसैनिक सौरभ घरत तसेच अंगणवाडी शाळेतील शिक्षिका व सेविका तसेच शाळेतील लहान मुले उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे