सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण व सो.क्ष. पा. सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, शांति निवास (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्पर्धा २०२४ चे आयोजन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण व सो.क्ष. पा. सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, शांति निवास (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञाती समाजातील पाल्यांसाठी शैक्षणिक स्पर्धा, त्याचप्रमाणे बंधु भगिनींसाठी पाककला व विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ७ यावेळेत रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, म्हातवली उरण येथे आयोजित करण्यात आले आहे.तसेच समाजातर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार व विविध स्पर्धेमधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तिंचा गौरव करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे (माजी नगराध्यक्ष) व प्रमुख पाहुणे म्हणून महेशजी बालदी (आमदार उरण विधानसभा)तसेच विशेष अतिथी परमपूज्य ॐदत्त श्री. ठाकुर महाराज यांच्या धर्मपत्नी सौ. कल्पना मधुकर ठाकुर (पूज्य मामी) यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. सन २०२२-२३ शालांत परिक्षेत इयत्ता १० वी, १२ वीत ७०% व अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच महाविद्यालयीन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा गौरव समारंभ रविवार दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५.०० वा. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदीर, उरण येथे संपन्न होणार आहे.तरी सर्व ज्ञाती बांधवांनी वरिल दोन्ही कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोमवंशिय क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरणचे अध्यक्ष अरुण पाठारे यांनी केले आहे.