pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ज्या जुन्या पदवीधर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातून काढायचे बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्राचा विलंब शुल्क/दंड माफ, पदवीधरांनी लाभ घ्यावा – प्रा. अमर शेख.

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12

डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ज्या पदवीधरांनी शिक्षण घेतलेले आहे परंतु अद्याप स्वतःचे पदवीचे प्रमाणपत्र घेतलेले नाही अशा विद्यार्थ्यांना मूळ फीस व्यतिरिक्त पहिल्या वर्षी 100 आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी पन्नास रुपये दंड आकारण्यात येतो असे अनेक जुने पदवीधर बांधव आहेत त्यांना शेकडो,हजारो रुपयांचा विलंब शुल्क किंवा दंड त्यांच्या पदवी प्रमाणपत्रासाठी लागत आहे,त्याच दंड माफीसाठी मी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या अनेक आजी- माजी सदस्य डॉ. शिवाजी मदन,डॉ. नरेंद्र काळे,डॉ.राजेश करपे,डॉ.गणेश शेटकर,डॉ.प्रा.आप्पासाहेब हुंबे, सिनेट सदस्य प्रा.बंडू सोमवंशी यांच्याशी सातत्याने विलंब शुल्क किंवा दंड माफ व्हावा यासाठी आग्रही होतो, त्याचेच फलित व्यवस्थापन परिषदेच्या परवाच्या बैठकीत दंड माफीचा निर्णय झाला, यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आभार,या अगोदर ही आपण 2013, 2017-18 ला दंड माफी करून घेतली होती,त्यावेळी आ. संदीप भैय्या क्षीरसागर आणि माजी आ. राहुल भैय्या मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त मी घरपोच पदवी प्रमाणपत्र पदवीधर आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते राबविले होते, आत्ताही मी पदवीधरांना फक्त विद्यापीठाच्या मूळ शुल्कात घरपोच पदवी प्रमाणपत्र मिळवून देणार आहे,त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जावून त्या पदवीधरांचे पदवी प्रमाणपत्रासाठी फॉर्म भरून घेत, विद्यापीठात जमा करणार, यामुळे त्या पदवीधरांचा येण्या जाण्याचा शेकडो,हजारो रुपये खर्च आणि वेळ मी वाचविणार आहे,अधिक माहितीसाठी 9405101034 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदवीधर विद्यार्थ्यांनी यासंधीचे सोने करावे असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस.पी. पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमर शेख यांनी केले आहे. —————————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे