pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नायगाव तहसील कार्यालयावर बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकार,मालमता नुकसान व हत्याच्या निषेधार्थ हिंदूंचा आक्रोश मोर्चा धडकला

0 3 2 1 8 1

नांदेड/प्रतिनिधी, दि.10

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधून या महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू बालवृद्ध आणि महिलांवरआत्याचार झालेले निदर्शनास येते. बांगलादेशात गेल्या काही अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना, रोखण्यासाठी आपल्या प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा मागणीचे निवेदन बजरंग दल व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार नायगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.
अमानवीय अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदू समूदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समूदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि ह्या, घटनांमूळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन च्या संबंधीत चिन्मय कृष्णं महाराज यांना खोटया गुन्ह्यात अडकवून जबदरस्तीने आणि हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभुनीय आहे. सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले. याचबरोबर असेही लक्षात आले आहे की, चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य’तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. ह्या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणा-या आहेत. चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मूस्लिम दहशतवादी ‘संघटना जसे की, हिज्ब उत. – तहरिर, जमातूल मुजाहिदिन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथीय आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते. ही बाब अतिशय निदनीय असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जिवीतास धोका निर्माण करणारी आहे आणि अशाप्रकारचे कृत्य बांगलादेश करत असल्यामुळे त्याना श्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय दबाव तंत्र निर्माण करून बांगलादेशातील होणारे हिंदूचे संरक्षण करावी अशी मागणी बजरंग दल व विविध हिंदू समाज संघटनेचे कैलास माधवराव शिंदे,नागेश मोरचोंडे,बळीराम वडजे, मेघा डोगळे,पुरुषोत्तम जाधव,गजानन स्वामी, वैभव देशमुख, सचिन पा कुष्णुरे, देवीदास तमनबोईनवाड, शिवलींग पुटेवाड,साईनाथ वंगरवार, गणेश मामीडवार, योगेश बामणे, गुरुनाथ चव्हाण, अविनाश चव्हाण,शेकडो हिंदु उपस्थितीत होते.असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे