शालिनीताई बुंधे यांची भाजपा प्रदेश चिटणीस पदी निवड

वडीगोद्री/प्रतिनिधी,दि.4
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाची नूतन प्रदेश कार्यकारणी जाहीर केली.यामध्ये शालिनीताई बुंधे यांची भाजपा प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शालिनीताई बुंधे यांच्या गत काळातील सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी निश्चितपणे होईल.या हेतूने ही निवड करण्यात आली.भारतीय जनता पक्ष वाढीसाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत काम करणार असून पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत घेवून जाणार असून पक्ष वाढीसाठी काम करणार आहे,असे त्या म्हणाल्या.
या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सौ विजयाताई रहाटकर,पंकजाताई मुंडे,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,भागवत कराड,ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे,नामदार अतुल सावे,प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर,शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर,ग्रामीण अध्यक्ष विजय औताडे,सर्व प्रदेश पदाधिकारी,सर्व मोर्चा व आघाडीचे प्रदेश पदाधिकारी,कार्यकर्ते,सर्व जाती धर्माचे अनुयायी यांनी अभिनंदन केले आहे.