सोनदेव धारा वाँटरग्रीडचे काम मार्गी लावा-गजानन ढाकणे

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी,दि.25
जालना तालुक्यातील सोनदेव धारा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत चा वॉटर गीड मध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून समावेश केलेला आहे पण आतापर्यंत वॉटर गीडचे पाणी गावाला आलेले वास्तविक पाहता आमचे गाव हे डोंगराळ भागात असून पाण्यासाठी खूप मोठी कसरत करावा लागत आहे सोनदेव धारा गट ग्रामपंचायतचा वॉटर गीड मध्ये समावेश असल्यामुळे आमच्या गावांचा जल जीवन मिशन मध्ये समावेश सुद्धा होत नाही त्यामुळे प्रशासनाला माझी प्रामाणिकपणे विनंती आपणास अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे आमचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून दोन 1/7/2023 तारखेच्या आत गावाची वॉटर गिड ची पाईपलाईन सुरू करावा किंव्हा आमचा गट ग्रामपंचायतचा जलजीवन मिशनमध्ये समावेश करावा अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने दखल घ्यावा व आमच्या सोनदेव धारा या दोन्ही गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा याबाबत अनेकवेळा लेखी निवेदन देऊनही आमचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे १ जुलैपासुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोनदेव धाराचे सरपंच गजानन ढाकणे यांनी केला आहे