महाराष्ट्र

दहीपुरी शिवारात महिलेचा खून

जालना/ प्रतिनिधी:दि.10


दहीपुरी शिवारातील गट क्र.309 मधील साहेबराव निर्मळ यांच्या शेतातील विहिरीत 40 वर्षीय महिलेचे प्रेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.थोडक्यात बातमी अशी की पानेगाव रोडलगत दहीपुरी शिवारात साहेबराव निर्मळ यांचे शेत आहे त्यांच्या विहिरीत सापडलेले प्रेत 40 वर्षीय महिलेचे असून तिचे नाव राधिका उर्फ बेबी हिवाळे, B&C कॉटर जालना असे आहे अशी फिर्याद महिलेचा मुलगा शुभम हिवाळे याने अंबड पोलिसात दिली आहे. 9 ऑक्टो.जमीन घेतलेल्या पैशाचे मिटून घ्यायचे आहे असे सांगून अजित निर्मळ ने राधिकाला साहेबराव निर्मल यांच्या दहीपुरी येथील गट क्रमांक 309 येथील शेतात नेऊन राजू निर्मल, सुनील साबळे, दावीत निर्मल यांच्यासह संगणमत करून गळ्यातील पोत व दोन मोबाईल काढून घेऊन मारहाण करून परत शेतातल्या विहिरीत टाकून निघून गेले. वरील चार जणांवर शुभम हीवाळे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन मध्ये कलम 302, 120(ब )201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास चालू आहे.घटनास्थळी पो.नि. अरविंद नांदेडकर यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close